खोट्या लग्नाचा बनाव करत व्यक्तीची फसवणूक

0
458

पुनावळे, दि. १७ जुलै (पीसीबी) – खोट्या लग्नाचा बनाव करून चौघांनी मिळून एका व्यक्तीची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 12 जुलै ते 16 जुलै या कालावधीत पुनावळे आणि इंदौर मध्य प्रदेश येथे घडला.

याप्रकरणी दिनेश जवाहरलाल औस्तवाल (वय 36, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला, अजय रोहन यादव (वय 22), राकेश सिसोदिया (वय 45, सर्व रा. इंदौर, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत पैशांसाठी खोट्या लग्नाचा बनाव केला. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करून 22 वर्षीय तरुणीचे फिर्यादी सोबत लग्न लाऊन दिले. त्या लग्नासाठी फिर्यादी यांनी तीन लाख रुपये खर्च केला. तसेच त्यांनी एजंटला देखील काही रक्कम दिली होती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी 22 वर्षीय पत्नीला अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.