खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाने पैशांची मागणी

0
50

महाळुंगे, दि. 17 : खेडचे आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्या नावाने पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अनोळखी व्यक्ती विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी दोन वाजताच्या सुमारास आंबेठाण येथे घडली.

सुमित मच्छिंद्र मोहिते (वय 27, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7875619961 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण येथील आर्जी प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आश्विन गर्ग यांना अनोळखी व्यक्तीने शनिवारी दुपारी फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो लोकसेवक आमदार दिलीप अण्णा मोहिते बोलत असल्याची बतावणी केली. आम्हाला काही सहकार्य होईल का. आता अडचणीत आहे, असे म्हणून फोनवरील व्यक्तीने अश्विन गर्ग यांच्याकडे पैसे अथवा इतर मालमत्ता मागण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.