खुनाच्या गुन्ह्यात आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी साक्षीदारावर दबाव

0
1009

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांनी साक्षीदारावर दबाव आणला. याप्रकरणी संबंधित आरोपीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 ते 27 डिसेंबर या कालावधीत मोहननगर चिंचवड येथे घडली.

अमोल वहिलेचा भाऊ राहुल उर्फ बाण्या विठ्ठल वहिले, सचिन मित्तल (रा. मोहननगर, चिंचवड) किशोर घुले याची आई आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय रंगनाथ वाघमोडे (वय 42, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2015 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी सांगतील त्याप्रमाणे न्यायालयात साक्ष देण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्यावर दबाव आणला. तसेच पैशांचे आमिष दाखवून आपल्या म्हणण्याप्रमाणे साक्ष न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.