खुनाचा कट रचणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

0
1537

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) -जेलमधून सुटणार असलेल्या आरोपीला ठार मारण्याचा कट रचण्यात आला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.

आकाश मनोज लोट (वय 22, रा. येरवडा, पुणे) आणि कृष्णा उर्फ बॉक्सर बाळू पारधे (वय 28, रा. मिलिंद नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश बाबासाहेब करपे (वय 35) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 17 ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान पिंपरीतील अशोक टॉकीज जवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून जेल मधील आरोपी रोहित वाघमारे हा जेलमधून सुटल्यावर त्याला ठार मारण्याचा कट रचला. तसेच आरोपी खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्याला लपून राहण्यासाठी सिम कार्ड पुरवून त्याची मदत केली.