खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन…

0
249

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. पण त्यांना पुन्हा सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. यानंतर विरोधकांकडून फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या घोषणेची सातत्यानं खिल्ली देखील उडवली गेली.

पण मागील वर्षी राज्यात सत्तापरिवर्तन झालं. आणि या सत्ता परिवर्तनाचे किमयागार फडणवीसच असल्याचंही समोर आलं. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा येईन घोषणा खरी करुन दाखवली. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे.

सध्या कर्नाटक विधानसभेचा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपनं आपल्या दिग्गज नेत्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचारासाठी कर्नाटक दौरा ठरला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगोदरच प्रचारात सहभागी झाले आहेत. याचवेळी मी पुन्हा येईन ची घोषणा सुरु पुन्हा चर्चेत आलं आहे.

भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली. त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर नृसिंह मंदिराला भेट दिली.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला आहे. बेळगाव दौरा आटोपून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी सीमाभागात नृसिंह मंदिराला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी आपलं कुलदैवत नृसिंह असून आपण कुठूनही प्रगती करतो असं ते म्हणाले. तसेच मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच.मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहीत आहे. हे तुम्ही देखील माहिती आहे असं विधान केलं. पण त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण दिलं.

मी पुन्हा येईन हा डायलॉग महाराष्ट्रा(Maharashtra)च्या राजकारणाला नवीन नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन असा डायलॉग मारला होता. फडणवीसांचा हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.