खिडकीचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न

0
174

निगडी, दि. २० (पीसीबी) – बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री साडेनऊ ते बुधवारी (दि. 19) सकाळी सात वाजताच कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडली.

महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची चोरीच्या उद्देशाने नासधूस करून अस्ताव्यस्त टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.