खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

0
14

पुणे दि .१8 (पीसीबी) – आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मस्साजोग गावातून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या आता सकाळीच मस्साजोग गावात दाखल झाल्या आहेत.व त्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर चर्चा करत आहेत.यावेळी मस्साजोग गावाचे नागरिक व देशमुख कुटुंबीय हे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करत आहेत.यावेळी मस्साजोग गावाचे नागरिक व देशमुख कुटुंबीय यांनी त्यांचे म्हणणे सादर केले . पोलिसांनी  आमची तक्रार तातडीने घेतली नाही. तसेच यातील सर्व आरोपी दिनांक ६ डिसेंबर पासून सरपंच संतोष देशमुख यांच्या मागावर होते.९ डिसेंबर रोजी दुपारी त्यांचे अपहरण करून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.अशी माहिती यावेळी सर्व गावकरी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व खासदार बजरंग सोनवणे तसेच आमदार संदीप क्षीरसागर देखील उपस्थित आहेत.दरम्यान काल सोमवारी सायंकाळी सर्व मस्साजोग गावातील नागरिकांची बैठक झाली असून या बैठकीत सर्व गावकऱ्यांनी दिनांक २५ फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकार ला आलटीमेटम दिला आहे.तोपर्यत आरोपी यांच्या वर कारवाई न केल्यास सर्व ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.