खासदार संजय सिंग यांच्या अटके विरोधात पिंपरीत आम आदमी पार्टी तर्फे निदर्शने

0
310

पिंपरी, दि.५(पीसीबी)- आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले.काल दिल्लीमध्ये घडलेल्या घटनाक्रमानुसार आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि काही पत्रकारांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. भाजपा आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात प्रखरतेने आवाज उठवणारे पत्रकार आणि विरोधकांवर एडी, सी बी आय, आणि पोलीस यंत्रणा मार्फत त्रास देत आहे. कालच्या अटकसत्रानंतर सरकारने देशामध्ये आणीबाणी लागू असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केले असून त्याचा विरोध करण्याकरता आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत असे सांगण्यात आले.

आंदोलकांनी जोरदार गोष्णाबाजी करत संजय सिंह यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.
या वेळी आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, अभिजीत सूर्यवंशी, संतोष इंगळे,सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ, गोविंद माळी, अजय सिंग,प्रकाश हागवणे,कमलेश रणवरे, रोहित सरनोबत, इमरान खान ,प्रदीप सूर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, शुभम यादव, संजीव झोपे, स्मिता पवार, सरोज कदम, सुरेश बावनकर, यल्लाप्पा वालदोर, रफिक अत्तार, दमयंती नेरकर, कल्याणी राऊत, चंद्रमणी जावळे, सीमा बावनकर, प्रशांत कोळवले, संजीव झोपे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.