खासदार श्रीरंग बारणे यांनी सहपत्निक केले मतदान

0
313

चिंचवड दि. २६. – पिंपरी, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सहपत्निक मतदान केले.

थेरगावातील संचेती प्राथिमक व माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर खासदार बारणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्या पत्नी सरिता बारणे यांनीही आपले मतदान केले.

मतदानानंतर खासदार बारणे म्हणाले, मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे बारणे म्हणाले