खासदार श्रीरंग बारणे यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, मग लायकी कळेल

0
315

तिरडी आंदोलनास पोलिसांचा नकार, पोलीस बळावर आंदोलन दडपले

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – ‘निम का पत्ता कडवा है, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव भडवै है’, ”गद्दार बारणे, आढळराव यांचे करायचे काय खाली डोके वर पाय”, ”गली गली मै शोर है, बारणे, आढळराव चौर है” अशी जोरदार घोषणाबाजी करत जमवलेली माया वाचविण्यासाठीच बारणे, आढळराव यांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच बारणे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. म्हणजे त्यांची लायकी कळेल असे खुले आव्हानही शिवसैनिकांनी दिले. पोलिसांनी तिरडी जाळण्यास नकार दिला. पोलीस बळावर आंदोलन दडपले.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे निष्ठावान सैनिक संतप्त झाले आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, मंगला घुले आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”गद्दार आजी-माजी खासदारांची तिरडी उचलून आंदोलन करणार होतो. त्यासाठी तिरडी आणली होती. परंतु, पोलीस बळावर दडपशाही केली जात आहे. पोलिसांनी तिरडी ताब्यात घेतली. पोलीस बळावर आंदोलन दडपले जात आहे. शिवसैनिकांना चुकीच्या पद्धतीने पोलीस ठाण्यात डांबून ठेवले जात आहे. शिवसैनिकांमुळे हे खासदार, आमदार झाले आहेत. शिवसैनिकांनी घरदार सोडून प्रचार करुन यांना खासदार केले. आजी-माजी खासदारांना पक्षाने काय कमी दिले होते. त्याचे आत्मपरिक्षण त्यांनी करायला पाहिजे होते. गद्दारांनी शिवसैनिकांचा घात केला. त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का त्यांच्या पुढील पाच पिढ्यांना बुजवता येणार नाही. रग्गड मालमत्ता कमविली असून ती झाकण्यासाठी, भ्रष्ट कारभार लपविण्यासाठी गद्दारी केली आहे. आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याचा शहर शिवसेनेवर कोणताही परिणाम झालेला नाही”.

खासदार बारणे शिवसैनिकांचा विश्वास घात करुन गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल. तर, खासदारकीचा राजीनामा द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे. म्हणजे त्यांची लायकी आणि अवकात कळेल. आगामी महापालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. खासदार बारणे यांच्यामुळे संघटनेला कोणताही फायदा होत नव्हता. खासदार बारणे ज्या पक्षात जातात, तो पक्ष संपतो. काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस शहरातून संपली. शिवसेनेत आल्यानंतर सेनेची नगरसेवसंख्या कमी केली. बारणे शिंदे गटात गेले, तो गटही संपणार आहे. बारणे हे पनवती आहेत. बारणे यांच्या रुपाने पक्षाला लागलेले ग्रहण सुटले आहे”.