खासदार श्रीरंग बारणे केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद ?

0
243
  • पिंपरी चिंचवड शहराला प्रथमच संधी मिळणार

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी सायंकाळी मोदी यांच्या उपस्थितीत सर्व घटकपक्षांच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्राचे चंद्रबाबू नायडू यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मंत्रीमंडळात कोणाचा किती वाटा तसेच कोणते खाते यावर चर्चा सुरू असून मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले श्रीरंग बारणे यांना थेट कॅबिनेट पदाची संधी मिळणार असल्याच्या बातम्या आहेत. पिंपरी चिंचवडकरांना प्रथमच संधी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून ४८ विजयी खासदारांत भाजपचे फक्त नऊ खासदार आहेत आणि त्यातून प्रामुख्याने नितीन गडकरी, नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळू शकते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सात खासदार असून त्यांना दोन एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी श्रीरंग बारणे यांच्यासह बुलढाण्यातून चौथी टर्म असलेले खासदार प्रताप जाधव यांची नावे चर्चेत आहेत.

खासदार बारणे यांनी २०१४ आणि नंतर २०१९ अशा दोन्ही टर्ममध्ये संसदिय कामकाजात स्वतःची छाप पाडली. विविध विषयांवरच्या चर्चा, ठराव तसेच विधेकांवरची भाषणे अशा माध्यमातून त्यांनी सहभाग घेतला म्हणून सर्वाधिक आठ वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. अंतिम टप्प्यात लोकसभा अध्यक्षांच्या सभातालिकेवरही त्यांचे नाव आले. हा अनुभव जमेस धरून त्यांना मोठी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

प्रताप जाधव हे राज्याच्या मंत्रीमंडळात होते तसेच त्यांची सलग चौथी टर्म आहे. शिंदे गटातील सात खासदारांमध्ये सर्वात जेष्ठ म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे पीसीबी प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनीही दुजोरा दिला.