खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

0
292

सातारा, दि. १२ (पीसीबी) – साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवारी (दि.12 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.