खासदार श्रीनिवास पाटील यांची मसपा कार्यालयाला भेट..

0
325

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित वर्षभर सुरु असलेला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साहित्यप्रेमी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शाखेला सदिच्छा भेट दिली.  महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ यांनी त्यांचे स्वागत केले आणि पुष्पगुच्छ, शाल, आणि ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला. त्यावेळी सहकार्यवाह माधुरी मंगरूळकर, अपर्णा मोहिले, किरण लाखे, किशोर पाटील, अरूण राव, दीपक देशमुख, देवीदास वंजारी आदी उपस्थित होते.

 खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरु असलेल्या शाखेच्या अभिनव अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी मी आलेलो आहे. त्याचे कारणही विशेष आहे. माझे शिक्षण झालेल्या एस. पी. महाविद्यालयाच्या शांता शेळके या माजी विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या कवितांचा मी चाहता आहे. त्यांची गाणी मलाच नव्हे तर सर्व सामान्यांच्या ओठावर आहेत. अश्याप्रकारे त्यांनी शांता शेळके यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांची ” दोन हात ”  ही कविता वाचून त्यांना मानवंदना दिली. तसेच त्या कवितेमधील वास्तवता विशद केली.  त्यांनी विविध साहित्यिक विषयावर चर्चा केली आणि  साहित्यिकांना मार्गदर्शन केले.
राजन लाखे यांनी शांता शेळके जन्मशताब्दी महोत्सवाबाबत सखोल माहिती दिली.तर, डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले.