खोपोली, दि. १६ – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विक्रमी मताधिक्यसह खासदार बारणे यांच्या हॅटट्रिकचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला.
खासदार बारणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना कार्यालयात शहर प्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड संघटक तात्या रिठे, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव, उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख हरेश काळे, सल्लागार अरुण पाटील, युवा सेनेचे जिल्हा सचिव सिद्धांत शेलार, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, उपशहर प्रमुख निखिल पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख मोहसीन शेख, कृष्णकांत विचारे, संपर्कप्रमुख प्रसाद वाडकर आधी पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाके वाजून खासदार बारणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरशेठ खंडेलवाल, विजय तेंडुलकर, हेमंत नांदे, शोभाताई काटे, डॉ. बबनराव नागरगोजे, रामू पवार, सुनील नांदे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
खोपोलीतील आतिकभाई खोत यांच्या घरी मुस्लिम बांधवांनी खासदार बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अशपाकभाई लोगडे, निजाम जळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी यावेळी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.
माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, रामदास शेंडे तसेच इब्राहिम पाटील, यशवंत साबळे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदींची खासदार बारणे यांनी भेट घेतली. सर्व ठिकाणी बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.