खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोजित केलेला भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनता दरबार रद्द

0
73

भोसरी, १८ जुलै (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दि. १८ जुलै रोजी आयोजित केलेले जनता दरबार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार हडपसर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जनता दरबार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात दि. १८ जुलै रोजी दोन ठिकाणी जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळविण्यात येणार आहे.