खान्देश मराठा मंडळ अध्यक्षपदी मधुकर पगार

0
187

निगडी, दि. १५ (पीसीबी) – निगडी प्राधिकरण सेक्टर २४ मधील खान्देश मराठा मंडळ कार्यकारिणीच्या झालेल्या सभेत नूतन अध्यक्ष म्हणून मधुकर सोनू पगार यांची निवड करण्यात आली आहे.

मंडळातर्फे राज्य पातळीवरही समाजसेवेचे कार्य १९८६ पासून अव्याहतपणे सुरू आहे. कोरोना काळात सर्वकाही ठप्प असतांना खान्देश मराठा मंडळ शहरात समाजसेवेचे कार्य करत होते. निगडी प्राधिकरण सेक्ट.२४ येथील भूखंडावर मंडळाच्या कार्यकारिणीने भव्य १२ मजली विविध उपयोगी वास्तूच्या बांधकामाचा संकल्प केला आहे.

मधुकर पगार मुळचे नासिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी कुटंबातील असून सटाणा येथे आय टी आय चे शिक्षण घेऊन पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स मध्ये १९८० पासून नोकरीस लागले.सलग ३९ वर्ष नोकरी करून २०१९ मध्ये निवृत्त झाले. टाटा मोटर्स मध्ये नोकरी करत असतांनाच तीन वर्ष कामगार युनियनमध्ये कामगार प्रतिनिधी म्हणूनही कार्य केले. १९९७ पासून मंडळाच्या विविध पदांवर काम करत आहेत.
उत्कृष्ठ सेवा कार्याबद्दल टाटा मोटर्स कडून मॅन ऑफ द मंथ, मॅन ऑफ द इयर आणि खान्देश भूषण असे पुरस्कार मिळालेले आहेत.