खानदेश मराठा मंडळचा शिवजन्म सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे डाॅ.युवराज कदम, शिवव्याख्याते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवरायांची आरती केली. राजमाता जिजाऊ व लहान शिवाजी महाराज यांचे मंडळात वेशभूषा करून आलेले नुतन पाटील व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा पृथ्वीराज पाटील यांचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
खांन्देश मराठा मंडळ मधील संचालक रमाकांत पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष हेमंत पाटील हे असून त्यांना मदतनीस मनोहर पाटील व रमाकांत पाटील हे होते.
व्याख्याते डॉ.युवराज कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या विषयावर शिवव्याख्यान दिले.आज सर्व माता भगिनींनी कशाप्रकारे आई जिजाऊ साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे या विषयावर त्यांनी छान प्रबोधन केले. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या लहानपणी केलेल्या गोष्टी आजच्या युगात कशा आचरणात आणून आपल्या मुलांचे आताचे आयुष्य चांगले व सुखकर करता येईल त्यासाठी त्यांनी योग्य माहिती दिली. पालकांना मुलांकडे उत्तम प्रकारे लक्ष कसे देता येईल त्यावर त्यांनी विशेष असे मार्गदर्शन केले. आता काळाची गरज आहे आपल्या मुलांना देव, देश, धर्म टिकवण्यासाठी त्यांच्यावर संस्कार लावणे हे गरजेचे आहे या विषयावर प्रबोधन केले. सर्व खान्देश मराठा मंडळ मधील अजीव सभासद यांनी डाॅ. युवराज कदम यांच्या व्याख्यानाला भरघोस टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अभिवादन केले.
त्याचबरोबर शिवजन्माचा पाळणा,कविता,चित्र प्रदर्शन,शस्त्र चालवणे व लाठी-काठी फिरवणे अशा प्रकारे उत्कृष्ट असे कार्यक्रम लहान मुलांनी सादर केले.त्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजून भरभरून प्रतिसाद दिला व सर्व मुलांचे कौतुक केले.
शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी आणले होते, त्यांना जनतेने चांगला प्रतिसाद देऊन मंडळाने नवीन उपक्रम राबवला त्याबद्दल स्वागत केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण हेमंत पाटील यांनी केले.
अनिल सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
खांन्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट.हेमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक गुलाबराव पाटील,प्रदीप शिंदे, बाळासाहेब पाटील,मनोहर पाटील,राजेंद्र देसले,किशोर पाटील,जितेंद्र पाटील,हेमंत पाटील,अनिल पाटील,अविनाश पाटील,शशिकांत बेहरे,सुरेश पाटील,मोतीलाल पाटील,जितेंद्र शांताराम पाटील, रमाकांत पाटील, महिला संचालक सौ.राखीताई निकम,सौ.दिपालीताई पाटील तसेच मार्गदर्शक कमिटी श्री.भगवान पाटील,श्री.संतोष पाटील,श्री.भिकन पाटील,श्री.माधव पवार,श्री.सयाजीराव पाटील,श्री.अनिल सावंत आजचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी सहकार्य केले.
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माता भगिनी व सभासद यांचे स्वागत व आभार मंडळाचे संचालक सौ.राखीताई निकम यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. कार्यक्रमाला आलेले सर्व सभासदांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.