खळबळजनक! पिंपरी चिंचवडमध्ये शाळेतील कर्मचार्‍यानेचं केला तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

0
111

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : शाळेतील ॲडमिन ऑफिसमध्‍ये काम करणार्‍या कर्मचार्‍याने तीन अल्‍पवयीन मुलींचा विनयभंग केला. ही घटना ऑगस्‍ट २०२४ ते २ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत घडली.

सरफराज मन्‍सुर शेख (वय ३२, रा. अकबर रेसिडन्‍सी, कोंढवा, पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेने याबाबत नव्‍याने सुरू झालेल्‍या दापोडी (भोसरी) पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

शाळेतील १३ वर्षीय अल्‍पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला सांगितले की आरोपी सरफरात याच्‍या शरिराला वेगवेगळ्या ठिकाणी स्‍पर्श करीत बॅड टच केला. तसेच शाळेतील १५ वर्षीय मुलीलाही आरोपीने बॅडटच केल्‍याचे सांगितले. अन्‍य एका मुलीचा शाळेपासून तिच्‍या घरापर्यंत पाठलाग केला. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.