खळबळजनक! कारमध्ये बसवून प्राचार्यानेचं केला विद्यार्थिनीचा विनयभंग

0
98

देहूरोड, दि. 24 (पीसीबी) : बोर्ड सर्टिफिकेट व मार्क मेमोमधील दुरूस्ती करून देतो, सांगून अल्पवयीन विद्यार्थिनीला कारमध्ये बसवून प्रवासात तिचा विनयभंग केला. ही घटना देहूरोड ते बोपोडी दरम्यान सोमवारी दुपारी घडली.

संयज शंकर यादव (वय 57, रा. यादव बंगला, मोहननगर, धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्राचार्य यादव आणि फिर्यादी मुलीची ओळख आहे. फिर्यादी यांच्या बहिणीच्या बोर्ड सर्टिफिकेट व मार्क ममो मधील दुरूस्ती करून देतो, असे सांगून फिर्यादी यांना देहूरोड येथून कारमध्ये बसविले. बोपाडी दरम्यान आरोपी प्राचार्य संजय यादव याने तरुणीच्या अंगाला स्पर्श करीत तिचा विनयभंग केला. तसेच तिला लॉजवर चलण्याची मागणी केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.