खरेदीसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे ब्रेसलेट पळवले

0
83

दि ६ जुलै (पीसीबी ) – दिघी, दि. 5 – सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना 23 जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, साई पार्क, दिघी येथे घडली.

महेंद्र पोखाराम चौधरी (वय 33, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे साई पार्क येथे बालाजी ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. 23 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला चौधरी यांच्या दुकानात ग्राहक बनून आली. तिने सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानातून 60 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे लेडीज ब्रेसलेट चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.