खरेदीच्या बहाण्याने आलेल्या जोडप्याने 57 हजारांचे दागिने पळवले

0
65

वाकड, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या एका दाम्पत्याने 57 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता रहाटणी येथील मनपुरम ज्वेलरी शॉप येथे घडली.गणेश चतुर वायफुले (वय 45, रा. पानमळा, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहाटणी येथील मनपुरम ज्वेलरी शॉप मध्ये काम करतात. त्यांच्या दुकानात शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एक जोडपे दगिने खरेदीच्या बहाण्याने आले. आरोपींनी हातचलाखीने 57 हजार 500 रुपये किमतीचे चार सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.