खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला

0
393

खराळवाडी, दि. २ (पीसीबी) – इमारतीच्या टेरेसवरून डोक्यात बाटली फेकल्याचा जाब विचारल्याने तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. ३१) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडली.

संतोष एकनाथ भागवत (वय ४१, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश गोडसे (वय ३०), संकेत गोडसे (वय २६), चेतन गोडसे (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी भागवत यांच्या डोक्यात इमारतीच्या टेरेसवरून बाटली टाकली. त्याचा भागवत यांनी जाब विचारला. तसेच भागवत यांच्यासोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी आणि हाताबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योगेश आणि संकेत या दोघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.