पुणे : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गडद होत असून आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणामध्ये पुण्यातील दोन बिल्डर असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यातील एक म्हणजे CA ललित पोफळे यांच्यावर गंभीर आरोप करत, या संपूर्ण रॅकेटमध्ये त्यांचा मोठा सहभाग असल्याचा दावा केला आहे. यासोबतच काही नामांकित व्यक्ती आणि एका बिल्डरचाही संबंध असल्याचे संकेत देत लवकरच आणखी नावे उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धंगेकर म्हणाले की, ललित पोफळे हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून गेल्या काही वर्षांत त्याने संशयास्पद पद्धतीने मोठी संपत्ती जमा केली आहे. “दहा वर्षांपूर्वी साधी परिस्थिती असलेला हा माणूस आज कोट्यवधींचा मालक कसा झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काळ्या पैशांचे पांढरीकरण करण्यामध्ये पोफळे पारंगत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.धंगेकर म्हणाले की, ललित पोफळे हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून गेल्या काही वर्षांत त्याने संशयास्पद पद्धतीने मोठी संपत्ती जमा केली आहे. “दहा वर्षांपूर्वी साधी परिस्थिती असलेला हा माणूस आज कोट्यवधींचा मालक कसा झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काळ्या पैशांचे पांढरीकरण करण्यामध्ये पोफळे पारंगत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.









































