खरात कडून महिलांना खायला देणाऱ्या त्या औषधाचं गूढ उलगडलं? खरातने पोलिसांना नक्की काय सांगितलं?

0
1


दि.३०(पीसीबी)- राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या खरातच्या काळ्या कारनाम्यांचे तब्बल ५६ व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिकच भीषण ठरत आहे.

तपास यंत्रणेनुसार, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी खरात एक ‘गूढ औषध’ वापरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना तो खारट किंवा कडवट चवीचे द्रव देत असे आणि त्यासोबत विशेष पेढे खायला लावत असे.

हे पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळ, चक्कर येणे, डोके जड होणे अशी लक्षणे जाणवत होती. त्यानंतर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना केबिनमधील दिवे बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा SIT चा गंभीर दावा आहे.एसआयटी आता या ‘विषारी’ पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा खरा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधांचे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

या ‘प्रसादा’मुळे महिलांना त्याच्या सूचनांचे पालन करण्यास भाग पाडले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, या द्रव पदार्थात आणि पेढ्यांमध्ये नेमके कोणते रसायन मिसळले होते, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. हेच या प्रकरणातील सर्वात मोठे गूढ ठरत आहे.

दरम्यान, सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात तपासात अजिबात सहकार्य करत नसून या गूढ औषधांबाबत तो मौन बाळगत आहे. त्यामुळेच SIT कडून त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.

काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खरातला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, १ तारखेपर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.आता SIT कडून या ‘विषारी पेढ्यां’चा आणि संशयित द्रव पदार्थाचा उगम शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, येत्या काही दिवसांत या गूढ औषधामागील रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.