खरातनंतर पुणे जिल्ह्यात सापडला दुसरा भोंंदू

0
1

दि.०२(पीसीबी)-राज्यात आणखी एक भोंदूबाबा समोर आलाय.पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीत या भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलंय. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं उघडकीस आलंय. एका 34 वर्षीय महिलेने या गवळीबाबा विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप या पीडितेनं केलाय. 8 महिन्यापुर्वी माझ्यावर लैगिक शोषणाचे खोटे आरोप करण्यात आले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयात कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा सापडला नाही. यात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. आतापर्यंत मी सर्व तारखांना हजर झालो आहे. महिलेने माझ्यावर धादांत खोटे आरोप केले, असे त्याने म्हटले आहे.

नवनाथ गवळीचे स्पष्टीकरण
मंदीराच्या जागेचा मोठा विषय होता. मी 12-13 वर्षापासून या क्षेत्रात आहे. कोणत्याही महिलेने माझ्यावर आरोप केले नाहीत. हे लोक शिवाच्या मंदिराला टाळे लावायला निघाले आहेत. तू हिंदू आहेस का? असा प्रश्न गवळी यांनी विचारला.
काळ्या, भगव्या कपड्यांवर जाणारे खरे भोंदू कोण आहेत? हे मी कोर्टात सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. मे 2025 मध्ये घडलेली घटना आहे. आम्ही सर्वसामान्य लोकं आहोत. कोणाकडून पैसे वैगेरे घत नाही. यांच्या ओळखीचे अधिकारी आहेत. त्यांनी मिळून षढयंत्र रचलंय, असे स्पष्टीकरण नवनाथ गवळी यांनी दिले आहे.