खरडीतील एक सर्वात मोठी प्रॉपर्टी डील

0
2

मुंबई प्रमाणे पुण्यातही मालमत्ताची मोठी उलाढाल होत आहे. अशातच पुण्यात एक मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे. 11 लाख स्क्वेअर फूटची मालमत्तेची विक्री जाली आहे. ही मालमत्ता भव्य ऑफिस स्पेस आहे. 10,00,00,00,000 रुपयांना हा सौदा झाला आहे. पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये या प्रॉपर्टी डीलची चांगलीच चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया पुण्यात कोणत्या एरियात ही मालमत्ता आहे. कुणी ही मालमत्ता विकत घेतली आहे.

प्राइम ऑफिसेस फंड (PRIME) ने पुण्यातील खराडी परिसरात खरेदी केली मालमत्ता

एक व्यावसायिक रिअल इस्टेट-केंद्रित कंपनी प्राइम ऑफिसेस फंड (PRIME) ने पुण्यातील खराडी परिसरात अंदाजे 11 लाख चौरस फूट पसरलेली प्रीमियम ऑफिस मालमत्ता विकत घेतली आहे. प्राइम ऑफिसेस फंडचे व्यवस्थापन नुव्मा आणि कुशमन अँड वेकफिल्ड मॅनेजमेंट (NCW) द्वारे केले जाते. ही मालमत्ता टेनस्टेप्स म्हणून ओळखली जाते. या अधिग्रहणासह, प्राइमने तिसऱ्या शहरात प्रवेश केला आहे. हा व्यवहार संयुक्त उपक्रम (JV) द्वारे करण्यात आले. या करारात PRIME ची 51 टक्के हिस्सा आहे. उर्वरित हिस्सा केपेलकडे आहे. सूत्रांचा अंदाज आहे की हा करार सुमारे 1,000 कोटींचा आहे. मात्र, अधिकृत आकडा यापेक्षा मोठा असू शकतो.

या व्यवहारानंतर, PRIME चा एकूण पोर्टफोलिओ ( दिल्ली-एनसीआर , चेन्नई आणि पुणे) अंदाजे 3.8 दशलक्ष चौरस फूट होईल. NCW चे एकूण सकल मालमत्ता मूल्य (GAV) आता 4,000 कोटींपेक्षा जास्त आहे. व्यवहार आमच्या शिस्तबद्ध भांडवली गुंतवणुकीच्या धोरणाशी सुसंगत आहे आणि प्रमुख वाढीच्या बाजारपेठांमध्ये उच्च-गुणवत्तेच्या, ग्रेड-ए+ मालमत्तेवर लक्ष केंद्रित करतो. पुणे ही अशी बाजारपेठ आहे जिथे आम्हाला गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन मागणी आणि मूल्यनिर्मिती दिसते असे मुख्य गुंतवणूक अधिकारी गौरव पुरी यांनी सांगितले