खड्डे बुजवा, उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करावा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

0
219

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे जुने खांब योग्य ठिकाणी हलवावेत, उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करावा, सीसीटीव्ही केबलसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवावेत, रस्ता डांबरीकरणाचे कामे लवकर करावीत, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकव्यात, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात, छाटलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा तात्काळ उचलण्यात यावा, अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आजपार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे 95 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 14, 10, 6, 5, 10, 13, 20 आणि 17 नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड , राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरातयांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आदी उपस्थित होते.

जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. यामध्ये शहरात लावण्यात आलेलेअनधिकृत फ्लेक्स आणि बोर्ड काढावे, वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे जुने खांब योग्य ठिकाणी हलवावेत, उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करावा, सीसीटीव्ही केबलसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवावेत, रस्ता डांबरीकरणाचे कामे लवकर करावीत, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकव्यात, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात, छाटलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा तात्काळ उचलण्यात यावा, रस्त्यातील राडारोडा उचलावा, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ओपन जिम दुरुस्त करण्यात यावी, अतिक्रमण हटवलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी, वास्तू व स्थळदर्शक फलक बसवावेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावेत, धूरफवारणी करावी, रस्त्यावरील अनधिकृत लावण्यात आलेल्या हातगाड्या हटवाव्यात, स्ट्रीटलाईट बसवावी, अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, आरोग्य आणि स्वच्छता विषयक समस्या आदी प्रश्न मांडण्यात आले.
तत्पूर्वी मागील जनसंवाद सभेमध्ये आलेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्याकार्यवाही बद्दल आढावा घेण्यात आला.