खंडणी विरोधी पथकाने पकडला तीन लाखांचा गुटखा

0
294

तळेगाव दाभाडे, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तीन लाख रुपयांचा गुटखा पकडला. तळेगाव दाभाडे येथे केलेल्या या कारवाई मध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 25) मध्यरात्री करण्यात आली.

निहार गोपाळ विश्वास (वय ५१, रा. तळेगाव दाभाडे), अविजित रणजीत बाच्छार (वय 26) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस तळेगाव दाभाडे परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली कि, शनिवारी मध्यरात्री एक कार तळेगाव दाभाडे येथे येणार आहे. त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन एमएच 14 / ईवाय 3668 ही कार ताब्यात घेतली. कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख 94 हजार 554 रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा, दोन मोबाईल फोन, कार असा एकूण सात लाख 54 हजार 554 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.