खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल; एकास अटक

0
654

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी एकाने 500 चौरस फूट जागेची मागणी केली. ती पूर्ण न केल्यास नवीन इमारतीचे काम होऊ देणार नाही, अशी धमकी बिल्डरला दिली. याप्रकरणी आठ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 8 ऑक्‍टोबर 2021 ते 31 मे 2022 या कालावधीमध्ये दिघी येथे घडली.

युनुस अब्बास सय्यद (वय 50, रा. काटेवस्ती, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक बाबासाहेब परांडे (वय 25, रा. विजयनगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. 31) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युनुस याने फिर्यादी यांच्या दिघीतील विजयनगर कॉलनी येथील जागेवर आपली गाडी बळजबरीने पार्क केली. तसेच त्या जागेवर ऑईलचे ड्रम ठेवले. त्यामुळे जागा मालक म्हणून कुलदीप परांडे व विकास डोळस यांनी आरोपीला सदर ठिकाणी लावलेली गाडी आणि ड्रम काढण्यास सांगितले. यावेळी आरोपीने गाडी काढण्याच्या मोबदल्यात 500 चौरस फूट जागा द्यावी, अशी मागणी केली. नाहीतर फिर्यादी परांडे यांना त्यांच्या श्री स्वामी समर्थ रेसिडंसी या नवीन इमारतीचे काम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.