भोसरी, दि. 31 (पीसीबी)
भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत तिघांनी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) रात्री आठ वाजता आदर्शनगर मोशी येथील आठवडे बाजारात घडली.
कार्तिक कारके, अनिकेत उटले आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेषेराव सोनेराव फड (वय ५०, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फड हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना भाजी विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी आरोपींनी खंडणीची मागणी केली. फड यांनी आरोपींना खंडणी दिली नाही, त्या कारणावरून आरोपींनी फड यांच्या वाहनाची आणि इतर वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच हवेत कोयता फिरवून दशहत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.