खंडणी न दिल्याने तरुणाची दहशत

0
30

भोसरी, दि.1 (पीसीबी)
झेरॉक्स दुकानदार महिलेकडे दोन हजारांची खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास महिलेने नकार दिला असता एका तरुणाने दुकानाच्या काउंटरवर आणि दुकानासमोरील वाहनांवर लाकडाने मारून नुकसान केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना मंगळवारी (दि. ३१) बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

अशोक दुर्गा पवार (वय १९, रा. बालाजीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक फिर्यादी महिलेच्या झेरॉक्स दुकानात आला. त्याने महिलेकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर अशोक याने दुकानाच्या काउंटरवर आणि दुकानासमोरील वाहनांवर दांडक्याने मारून नुकसान केले. अशोक याच्या दहशतीला घाबरून आजूबाजूचे लोक घरात गेले. त्यानंतर अशोक याने परिसरातील दुचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.