खंडणी न दिल्‍याने कार्यालयाची तोडफोड

0
117

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) चाकण,
दीड हजार रुपयांची खंडणी न दिल्‍याने गुंडांनी कार्यालयाची तोडफोड करीत 30 हजारांचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजताच्‍या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.

अशोक परणसिंग रेबारी (वय 33, रा. झित्राईमळा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज विनयकांत शर्मा (वय 28, रा. नाणेकरवाडी, चाकण) आणि आशुतोष अर्जुन टिपाले (वय 22, रा. बर्गे वस्ती, कुरुळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मनोज शर्मा याने फिर्यादी अशोक यांना फोन करून दीड हजार रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्‍या आरोपींनी नाणेकरवाडीतील आळंदी फाटा येथे असलेले फिर्यादी अशोक यांचे रेबारी टेम्पो ट्रान्‍सपोर्ट ऑफीसमध्ये जाऊन मोठमोठयाने आराडा-ओरडा करून, परीसरात दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ करून लोकांमध्ये भितीचे वातारण निर्माण करून दीड हजार रुपये दया, अशी मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांनी फिर्यादीचे ऑफीसमध्ये घुसुन साहित्याची तोडफोड करून 25 ते 30 हजाराचे नुकसान केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.