खंडणीसाठी सुताराला लाकडी दांडक्‍याने मारहाण

0
130

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,

खंडणीसाठी एका सुताराला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना मारूंजी येथे रविवारी (दि. ११) सायंकाळी घडली.

भगिरथ राम बिष्णोई (वय २१, रा. लाईफ रिपब्लीक, कोलते पाटील स्‍कीम, मारूंजी), असे मारहाणीत जखमी झालेल्‍यांचे नाव असून त्‍यांनी सोमवारी (दि. १२) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर सोमनाथ जाधव (वय १८), अनिकेत विकास सपताळे आणि त्‍यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. आरोपी समीर आणि अनिकेत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीस म्‍हणाले की, तुम्ही येथे येऊन पैसे कमवता. त्यामुळे आम्हालाही दर महीन्‍याला पैसे दयावे लागतील, असे बोलून खंडणी मागितली. तसेच फिर्यादी बिष्णोई यांना लाथाबुक्‍क्यांनी व लाकडी दांडक्‍यांनी मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.