खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; माथाडी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

0
648

काळेवाडी, दि. ५ जुलै (पीसीबी) – काळेवाडी माझ्या एरिया मधून माल न्यायचा असेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत ट्रक चालकांना मारहाण करत जबरी चोरी केली. याप्रकरणी भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री सव्वा अकरा वाजता ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात असताना आरोपी त्याच्या सफारी कार (एमएच 12/जेसी 7392) मधून आला. त्याने त्याची कार फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या दोन ट्रकला आडवी लागली. आरोपीने तिन्ही ट्रक चालकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने फिर्यादीस मारण्याचा प्रयत्न केला.

मी सुरेश बनसोडे आहे. भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्ही माझ्या एरिया मधून मला पैसे न देता माल कसा घेऊन जाणार, असे म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे विनंती केली की, माझ्याकडे फक्त एक हजार रुपये आहेत. प्रवासामध्ये ते आम्हाला लागतील. त्यावरून आरोपीने बळजबरीने ते पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.