बीड, दि. १९ (पीसीबी): क्रेनच्या धडकेत एका 36 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.14) रुपीनगर, तळवडे येथे झाला आहे.
उमेश रमेश भोसले (वय 36) असे मयत नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी बाळासाहेब संदिपान जाधव (वय 29 रा.माजलगाव, बीड) यांनी गुरुवारी (दि.18) फिर्याद दिली असून एम एच 14 के 1260 या क्रेनच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे उमेश हे पुजा इंटरप्राजेस कंपनी समोरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील क्रेन बेदरकारपणे चालवून भोसले यांना पाठी मागून धडक दिली. यात भोसले खाली पडले असता क्रेन त्यांच्या पायावरून गेले व गंभीर जखमी झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून क्रेन चालकावर गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस याचा पुढील तपास करत आहे.