क्रेन अडवून चालकाला शिवीगाळ; सहा जणांना अटक

0
61

महाळुंगे, दि. 23 (पीसीबी) : कंपनीमध्ये काम करण्यासाठी क्रेन घेऊन जात असलेल्या चालकाला सहा जणांनी मिळून शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) सायंकाळी महाळुंगे येथील जेबीएम ऑटो लिमिटेड या कंपनीच्या गेट समोर घडली.

अभिषेक जावळे, चैतन्य कमलाकर पाटील (वय 22), प्रथमेश चंद्रकांत माळी (वय 23), सतीश रामदास गोरे (वय 23), मोहन भरत गरुड (वय 26), संकेत शरद नऱ्हे (वय 22, सर्व रा. महाळुंगे, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिजीत लक्ष्मण काचोळे (वय 33, रा. निगडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चालक राजकुमार यादव हा त्याच्या ताब्यातील क्रेन घेऊन कामासाठी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. कंपनीमध्ये जाण्यास प्रतिबंध केला. क्रेन अडविल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी शिवीगाळ दमदाटी केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.