क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
189

क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता विप्रो सर्कल, फेज दोन हिंजवडी येथे घडला.

अमोल राठोड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संदीप लक्ष्मण राठोड (वय 21, रा. मारुंजी. ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्रेन (एमएच 14/जेई 5256) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमोल राठोड हा विना हेल्मेट दुचाकीवरून जात होता. विप्रो सर्कल येथे क्रेनने त्याला धडक दिली. त्यामध्ये अमोल याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर क्रेन चालक घटनास्थळावरून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.