क्रेडीट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने डॉक्टरची सहा लाखांची फसवणूक

0
151

क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेकडून गोपनीय माहिती घेत सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे रोजी विजलीनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी डॉक्टर महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या 7 मे रोजी घरी असताना त्यांना 9289334739 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो एक्सिस बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी महिलेला त्यांच्या क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करून फोनवर आलेला नंबर विचारून घेतला. त्यानंतर फिर्यादीची सहा लाख सहा जणांची फसवणूक केली.