क्रेडीट कार्डचा प्रोटेक्शन प्लान डिसेबल करण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

0
248

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – क्रेडीट कार्डचा प्रोटेक्शन प्लान डिसेबल करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेची पाच लाख चार हजारांची फसवणूक केली. ही घटना 27 जून रोजी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8827820404, 9628269423 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने 8827820404, 9628269423 या क्रमांकावरून फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीला विश्वासात घेतले. फिर्यादीच्या क्रेडीट कार्डवर प्रोटेक्शन प्लान अनेबल झाला आहे. तो डिसेबल करण्यासाठी एक ट्रांजेक्शन करावे लागेल असे सांगितले. मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगून त्या आधारे फोनवरील व्यक्तीने फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधून पाच लाख चार हजार 770 रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.