क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एक लाख ३२ हजारांची फसवणूक

0
233

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची एक लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आला आहे.

चेतन रवींद्र वाणी (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ मॉरिशस या बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. ते कार्ड बंद करण्यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधला. त्यावर संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी फिर्यादीस एक ओटीपी पाठवला. ओटीपी शेअर करताच फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ३२ हजार ८५८ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.