क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने 38 हजारांची फसवणूक

0
64

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने अनोळखी महिने एका महिलेची 38 हजारांची फसवणूक केली. ही घटना 14 जून रोजी दुपारी यशवंत नगर, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी 28 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9045170643 क्रमांक धारक महिला सपना (पूर्ण नाव पत्ता नाही नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेने फिर्यादी महिलेला फोन केला. फोनवरील महिलेने ती ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड नंबर आणि ओटीपी घेतला. त्या आधारे महिलेची 38 हजार 721 रुपयांची फसवणूक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.