- विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाची मागणी
- पिंपरी मध्ये जोरदार आंदोलन
पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : शिवप्रभूंच्या जयंती निमित्त आणि धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या बलिदानमासाचे औचित्य साधत आज सोमवार, दिनांक १७.०३.२०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे असलेली क्रूरकर्मा औरंग्याची कबर म्हणजेच आपल्या पारतंत्र्याची निशाणी उखडून टाकण्याची शपथच विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ घेतली, यापुढे जोपर्यंत ही कबर उखडली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार असल्याचे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी सांगितले.
निषेध नोंदवून झाल्यावर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री श्री. नितीन वाटकर, प्रांत धर्म यात्रा महासंघाचे प्रमुख अशोक यलमार, प्रांत धर्मप्रसार प्रमुख ॲड. मृणालिनी ताई पडवळ, पिंपरी - चिंचवड जिल्ह्याचे अध्यक्ष शरद इनामदार , जिल्हा मंत्री धनंजय गावडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संभाजी बालघरे तसेच संपूर्ण पिंपरी - चिंचवड शहरातील संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.