पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – युएसडीटी ही क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास सांगत चार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 6 ते 14 मार्च या कालावधीत मोरवाडी रोड, पिंपरी येथे घडली.
विजयकोदंडारामन स्वामिनाथन (वय 64, रा. मोरवाडी रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 85256047752, 81066450908, 7780946191 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादींसोबत व्हाट्सअप द्वारे संपर्क केला. त्याने फिर्यादींना एक अॅप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावरून युएसडीटी ही क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास सांगून खरेदी केलेली क्रिप्टो करन्सी एका वेबसाईटवर ट्रान्सफर करायला लावली. त्यावरून फिर्यादींनी तीन लाख 91 हजार 385 रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी केली. ती आरोपींनी दिलेल्या वेबसाईटवर पाठवली. मात्र आरोपीने फिर्यादींना त्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादींनी तक्रार अर्ज केला होता, त्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.