क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांना अटक

0
354

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेत असलेल्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 8) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

नरेश जगन्नाथ अग्रवाल (वय 40), विशाल राजू अग्रवाल (वय 24, दोघे रा. आंबेडकर कॉलनी रिव्हर रोड पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक शैलेश मगर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग या क्रिकेट सामन्यावर आरोपींनी मोबाईल कॉलद्वारे बेटिंग घेतली. याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन, वही, डायरी, पेन असे 52 हजार 155 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.