क्रिकेट खेळताना किरकोळ वाद; मॅचमध्ये स्टंप व बॅटने मारहाण

0
222

शिरगाव, दि. ८ (पीसीबी) – क्रिकेट मॅच मध्ये झालेल्या वादावरूनसहा जणांनी मिळून तरुणाला सहा जणांनी मिळून स्टंप व बँटने मारहाण केली आहे. हीघटना रविवारी (दि.8) दुपारी मावळातील पुसाने गावात घडली आहे.

याप्रकरणी भरत किसन वाटाणे (वय 26 रा.ओवळे, मावळ)यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शशिकांत साठे, शेखर साठे, लखन साठे,तेजस तावरे व राजू साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बारणे यांच्यामोदानात ओवळे गावची प्रिमीयर लिग सुरु होती. ज्यामध्ये एका मॅचमध्ये फिर्यादी वशशीकांत यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्याइतर साथीदारांसह स्टंप व बॅटने मारहाण करून जखमी केले. शिरगाव पोलिसांनी गुन्हादाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.