महाळुंगे, दि.26 (पीसीबी)
क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका कुटुंबास बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात घडली.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २५) महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकनाथ वसंत मेंगळे,ञनोहर शिवराम मेंगळे, अनिल बबन मेंगळे आणि बबन आप्पा मेंगळे (सर्व रा. मु. पो. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी महिलेच्या घराजवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी फिर्यादी महिला या सामाईक जमिनीमध्ये जनावरांचे शेण गोळा करुन जळणाकरीता गवर्या घालत होत्या. शेजारीच फिर्यादी यांच्या वस्तीवरील मुले क्रिकेट खेळताना एक चेंडु फिर्यादी यांच्या दिशेने जोरात आला. फिर्यादी यांचे सासरे शांताराम मेंगळे यांनी खेळणार्या मुलांना चेंडू इकडे आम्हाला लागेल. तुम्ही इकडे चेंडु मारु नका, असे सांगितले. या कारणावरुन खेळणार्यांपैकी फिर्यादी यांचे चुलत दीर यांनी संगणमत करुन तुम्ही आम्हाला खेळू देत नाही. तुमच्या गवर्याच पेटवून देतो, असे म्हणत फिर्यादी व सासरे शांताराम मंगळे यांना शिवीगाळी करुन हातातील बॅटने व बबन आप्पा मंगळे यांनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपींनी सासरे शांताराम मेंगळे, नवरा संजय मंगळे, सासु बारकावाई मेंगळे यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीस व डावे हाताचे कोपराला फॅक्चर झाले. तसेच सासरे, सासु व नवरा यांना पाठीस, कमरेस, हातास व डोक्यास मुकामार लागला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.