क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त, पुतळ्यांस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडून पुष्पहार अर्पण

0
224

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) स्वातंत्र्यपूर्व काळात देशात क्रांतीची मशाल प्रज्वलित करून देशभक्त, क्रांतिकारकांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज रुजविणारे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे स्वतः युद्धकलाकौशल्य निपुण तर होतेच शिवाय ते सामाजिक समतेसाठी आग्रह धरणारे थोर समाजसुधारक देखील होते असे मत महापालिकेचे अतिरिक्त उल्हास जगताप यांनी आज व्यक्त केले.

  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त या दोन्ही महापुरूषांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यांस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते. 

अभिवादन कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व अध्यक्ष संजय धुतडमल,माजी नगरसदस्य राम पात्रे, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, युवराज दाखले, नितीन घोलप, विशाल कसबे, भगवान शिंदे,अविनाश शिंदे, मिराताई आल्हाट, विठ्ठल कळसे,आण्णा कसबे, संदीप जाधव, वसंत वावरे, बाबू पाटोळे, बापू झाडे, निलेश गायकवाड,सुनिल भिसे, दयानंद मोरे, नारायण गायकवाड, शिवाजी खडसे, धुराजी शिंदे, कैलास कसबे अक्षय पोळ, के.एम.बुक्तर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

थोर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपुर्ण योगदान आहे. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी असंख्य क्रांतिकारकांच्या फौजा उभ्या केल्या. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन एकनिष्ठ समाज, देशभक्त नागरिक तयार व्हावेत, यासाठी लहुजी वस्ताद यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तसेच थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थिती विरोधात आवाज उठवला,गावोगावी जाऊन इंग्रजांच्या विरोधात बंड केले. स्वदेशी मालाच्या वापरावर भर देत त्यांनी विदेशी मालावर बहिष्कार टाकला. इंग्रजांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी समाजप्रबोधनही केले.