क्रांतिदिनाच्या दिवशी भाऊसाहेब भोईर यांच्या ‘चला बोलूयात परिवर्तनासाठी’ अभियानाला सुरवात

0
55

अभियानामाध्यमातून मतदारसंघातील सर्व नागरिकांशी संवाद साधणार

पिंपरी, दि. ९ – माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी क्रांतिदिनाच्या दिवशी ‘चला बोलूयात परिवर्तनासाठी’ या अभियानाला सुरवात केली आहे. चिंचवड गावातील हुतात्मा चाफेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला सुरवात करण्यात आली.


भाऊसाहेब भोईर युवा मंचच्या वतीनं संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंर्तगत चिंचवड विधानसभेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
आज सकाळी अभियानाचा प्रारंभ करताना भाऊसाहेब भोईर यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोराळे, गणेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते निलेश डोके, आप्पा भोईर,गतीराम भोईर, सहदेव भोईर, राहुल भोईर, हेमंत भोईर, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, रामभाऊ आव्हाड, सुदाम परब, संतोष पाटील, संजय पवार, अजय तेलंग, खलील शेख, रवींद्र माने, चेतन गावडे, सचिन सावंत, नकुल भोईर, दीपक भोईर, अक्षय भोईर पैलवान विजय हनुमंत गावडे, सागर चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, चिंचवड ही भक्ती आणि क्रांतीची भूमी आहे. या भूमीतून प्रेरणा घेऊन क्रांतीकारकांना अभिवादन करत नव्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही या अभियानाची सुरवात करत आहोत.
हुतात्मा चाफेकर बंधूंना अभिवादन केल्यानंतर महासाधु श्री मोरया गोसावी यांचे दर्शन घेऊन शहरातील सर्व महामानवांच्या स्मारकांना भेट देत अभिवादन करण्यात आले.