कौशल्यम उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांसाठी मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार…

0
48

कौशल्यम कार्यक्रमातंर्गत एच.आर कोन्क्लेव्हमध्ये उपस्थित एच.आर व्यवस्थापकांना मार्गदर्शन…

पिंपरी, दि. 02 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्यम कार्यक्रम अंतर्गत एच.आर. कोन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्याते रमण नंदा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित व्यवस्थापकांना मार्गदर्शन करताना शहरातील निर्माण होणाऱ्या संधी व त्यामधील कौशल्ये यावर भर दिला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी उपस्थित व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले.

यावेळी नरळे म्हणाले की, आपणास लागणाऱ्या मनुष्यबळासाठी लाईटहाऊसचा कौशल्यम उपक्रम उपयुक्त असून यामाध्यमातून उपयुक्त कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे.
यावेळी शहरातील विविध कंपन्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन अविरतपणे कार्यरत असल्याचे लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख अमृता बहुलेकर यांनी सांगितले.

यावेळी लाईटहाऊसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर यांनी लाईटहाऊसच्या कौशल्य उपक्रमची माहिती उपस्थित त्यांना दिली. सदर कार्यक्रमामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरातील 50 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचे एच.आर. मॅनेजर उपस्थित होते. यामध्ये हेल्थकेअर सेक्टर, रिटेल सेक्टर, लॉजिस्टिक सेक्टर, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर आदी क्षेत्रातील प्रतिनिधी होते. यावेळी नॅशनल प्लेसमेंट हेड रोहित घोष यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.