`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमात कोल्हापूरची गृहिणी बनली करोडपती

0
244

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – KBC 14: अमिताभ बच्चनचा शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ सीझनला स्पर्धकांमधून पहिला करोडपती मिळाला आहे. हा करोडपती एक महिला स्पर्धक आहे,जी महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये राहणारी आहे. गृहिणी असलेल्या कविता चावला केबीसी 14 सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत,ज्यांनी 1 करोड जिंकून रेकॉर्ड बनवला आहे.

‘कौन बगेगा करोडपती 14’ चा नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतूनच ही माहिती देण्यात आली आहे. तसंच या प्रोमोत हे देखील दाखवलं गेलं आहे की कविता चावला केबीसी च्या शेवटच्या प्रश्नावर पोहोचल्या आहेत,ज्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन त्या 7.5 करोड जिंकतील.

‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या प्रोमोची सुरुवातच कविता चावला यांच्या 1 करोड जिंकण्याने होते. आता त्या 17 व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार, जो प्रश्न 7.5 करोड रुपये त्यांना जिंकून देईल. सगळ्यात खास गोष्ट ही आहे की,कोल्हापूरहून आलेल्या कविता चावला एक गृहिणी असूनही त्यांनी खूप हुशारीनं खेळ खेळत 1 करोड जिंकून इतिहास रचला आहे. आता पहायचं की त्या 7.5 करोडच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात की नाही.

या प्रोमोला शेअर करताना केबीसीच्या मेकर्सनी सांगितले आहे की,कविता चावला या गृहिणी आहेत. आणि त्या 1 करोड जिंकल्या आहेत. कविता करोडपती बनल्या हे जसं व्हायरल झालं तसं सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. सगळे त्यांनी 7.5 करोड आता जिंकावेत अशा शुभेच्छा देत आहेत.